Posts

अवलिया..

             आंजर्ले , दापोली पासून जेमतेम २०/२५ km  अंतरावरच  गाव.. रात्रीचा प्रवास करून ,सकाळी तिथे पोहचल्यापासून कामाला लागायच होत.. तीन दिवसाचं काम .. गाडीमधे एका project वर काम करायच  म्हणून आणि फक्त म्हणूनच एकत्र आलेले आम्ही चारजण.. अनोळखी माणसांमधल्या शांततेपेक्षा ओळखीच्या माणसांमधली शांतता खूप awkward असते.. तसच काहीसं या प्रवासात चालू होत.. कोकणच्या त्या वळणा वळणाच्या काळोखात आमची गाडी आंजुर्ल्याच्या दिशेने जात होती ..                   "पुढच्या ३०/३५ दिवसात शूटिंग चालू होईल, cut to cut budget,त्यात prepoduction च्या कामात allready एका माणसाचा budget  वाढलाय" Producer  साहेबांनी  माझ्यासाठी budget चा टोमणा मारून शांतता भंगली होती .. मला त्यांच्या बरोबर वाद घालण्यात अजिबात interest नव्हता .. Sound  च्या लोकांच Pre-production मध्ये काही काम नसतं या विचाराचे Producer साहेब .. मी मस्त फिरायला आणि budget  वाढवायला आलोय हा त्यांचा ठाम विश्वास .. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता आणि मी त्यांना answerable पण नव्हतो ,Director ला हव्या असलेल्या s